गोपाल व्यास | वाशिम: वाशिम जिल्ह्याचे शिल्पकार माजी खासदार स्वर्गीय पुंडलिकराव गवळी यांनी रिसोड शहरा करता नळगंगा योजना मंजूर करून रिसोड शहराचा पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला होता. परंतु रिसोड शहराचा वाढता व्यास वाढती लोकसंख्या लक्षात घेता आमदार भावना गवळी यांनी रिसोड शहरा करता वाढीव पाणी पडण्याची शहरासांची असलेली अत्यंत महत्त्वाची गरज लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून शहराला वाढीव पाणीपुरवठा म्हणून 75 कोटी रुपयाचा निधी जवळपास मंजूर केला असून त्याची प्रशासकीय मानता लवकरच निघणार आहे.
रिसोड शहरासह तालुक्याचा प्रलंबित असलेला विकासाचा बॅकलॉग आमदार भावना गवळी मोठ्या झपाट्याने पूर्ण करत आहेत. रिसोड शहराचा वाढत चाललेला परिसर व लोकसंख्या याचा भविष्याचा विचार करून शहरवासाची वाढीव पाणीपुरवठासाठी असलेली मागणी शहराची सद्यस्थितीत व भविष्यात पाण्याची गरज लक्षात घेऊन हा विषय मुख्यमंत्री यांच्याकडे सतत मांडला.
त्यामुळे रिसोड शहराला वाढीव पाणीपुरवठा म्हणून 75 कोटी रुपयाचा निधी देण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखविला आहे त्यामुळे रिसोड शहराला आमदार भावना गवळी यांच्या प्रयत्नाने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे.