तरुणांना सिक्युरिटी कंपनीमध्ये नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून आर्णी शहरातील १८ तर यवतमाळ मधील ४७ असे एकुण ६५ जणांना गंडा घातल्याचा प्रकार घडकीस आलाय. दरम्यान आर्णी आणि यवतमाळ येथील एकूण ६५ जणांची फसवणुक करून लाखो रूपयांचा चुना लावल्याची माहिती समोर आली आहे.
एस.आय. एस. सिक्युरिटी कंपनीमध्ये नोकरी लावून देण्यासाठी बेरोजगार तरूणांकडून पैसे उकळणाऱ्या प्रकाश उर्फ जगदीश राठोड याच्याविरुद्ध आर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. अजय दिगंबर ठाकरे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या कोरोनामुळे लाखो तरूण बेरोजगार असून ते नोकरीच्या शोधात आहेत.