लोकांना या दिवशी आरोग्याशी संबंधित समस्या आणि आरोग्याशी संबंधित अधिकारांबद्दल जागरूक केले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेच्या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य दिन ७ एप्रिल १९५० मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापने बरोबरच जागतिक आरोग्य दिनाचीही पायाभरणी झाली. आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकांना गंभीर आजारांपासून जागरूक आणि सुरक्षित करण्यासाठी जगातील अनेक देशांनी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. जागतिक आरोग्य दिन १९५० मध्ये स्थापन झाल्यानंतर दोन वर्षांनी प्रथमच साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी ७ एप्रिलला आरोग्य दिन साजरा करण्यासाठी एक वेगळी थीम तयार केली जाते.
जागतिक आरोग्य दिन २०२४ ची थीम 'माझे आरोग्य, माझे हक्क' (My Health My Right) आहे. जगभरातील आरोग्य समस्या आणि संबंधित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी या वर्षीची थीम तयार करण्यात आली आहे. प्रत्येकाला अत्यावश्यक आरोग्य सेवा, आरोग्य शिक्षण आणि संबंधितमाहिती सर्वत्र मिळावी यासाठी ही थीम तयार करण्यात आली.
शुद्ध पिण्याचे पाणी, शुद्ध हवा, आवश्यक पोषण, राहण्यासाठी चांगले घर, चांगले वातावरण आणि काम करण्याची परिस्थिती हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे आणि हाच विचार करून जागतिक आरोग्य संघटनेने २०२४ सालासाठी जागतिक आरोग्य दिनाची थीम 'माझे आरोग्य, माझे हक्क' ही ठेवली आहे.