लोकशाही स्पेशल

Friendship Day 2023 : 'दिल चाहता है'पासून ते आरआरआरपर्यंत, हे बॉलिवूड चित्रपट मैत्रीचा अर्थ शिकवतात

रक्ताच्या नात्यापेक्षा जर कोणते नाते जास्त खोल असेल तर ते मैत्रीचे.

Published by : Siddhi Naringrekar

रक्ताच्या नात्यापेक्षा जर कोणते नाते जास्त खोल असेल तर ते मैत्रीचे. म्हणूनच मित्रांसाठीही एक खास दिवस समर्पित केला जातो, तो म्हणजे 'फ्रेंडशिप-डे'. या दिवशी लोक त्यांच्या मित्रांना शुभेच्छा देतात तसेच त्यांच्यासोबत वेळ घालवतात. काही लोक घरी मजा करतात, कोणी पार्टी करतात, फ्रेंडशिप डे जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो. बहुतेक देशांमध्ये, 30 जुलैलाच फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. भारत, बांगलादेश, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यासारखे काही देश ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करतात. फ्रेंडशिप डे सेलिब्रेशनची तयारी सुरूअसताना, त्यामागची कहाणी काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे. मित्रांवर जशी अनेक गाणी बनली आहेत, तसेच अनेक चित्रपट आहेत ज्यात खरी मैत्री दाखवण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला फ्रेंडशिप डेनिमित्त अशाच काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.

दिल चाहता है (Dil Chahta Hai)

'दिल चाहता है' फरहान अख्तर दिग्दर्शित मित्रांच्या कथा आहे. यात मैत्री आणि नातेसंबंधांचा एक वेगळा दृष्टीकोन दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये तीन मित्र अभ्यासानंतर आपापल्या आयुष्यात व्यस्त होतात, पण अनेक वर्षांनी भेटल्यावर पुन्हा एकदा त्यांची मैत्री जगतात. तिघेही वेळ काढून गोव्याला जातात आणि खूप मजा करतात.

वीरे दी वेडिंग (Veere Di Wedding)

करीना कपूर, सोनम कपूर स्टारर हा चित्रपट चार मुलींच्या मैत्रीची कथा आहे. ज्यात एक मैत्रिण तिच्या उध्वस्त झालेल्या लग्नावर नाखूष होऊन फिरत आहे. पण ती लग्नाच्या नावाने घाबरलेली आहे. चार मित्र मिळून एकमेकांची हिम्मत वाढवतात आणि खूप मजा करतात. मित्रांची ही कहाणी आजच्या तरुणाईला चित्रपटाशी जोडते.

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' (Zindagi Na Milegi Dobara')

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे. हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओलची घट्ट मैत्री चित्रपटात दाखवण्यात आली आहे. जे स्पेनला जाऊन आयुष्याचा आनंद लुटतात आणि खूप मजा करतात. या चित्रपटात खूप भावनाही दाखवण्यात आल्या आहेत.

आरआरआर (RRR)

आम्ही नवीन चित्रपट 'RRR' ने सुरुवात करू. ज्यामध्ये राम आणि भीमाची अतूट मैत्री दाखवण्यात आली आहे. दोघांचाही उद्देश आहे, पण पद्धती वेगळ्या पद्धतीने दाखवल्या आहेत. दोन अनोळखी माणसे कुठलाही स्वार्थ न ठेवता कशी पक्की मैत्री करतात हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. जीव पणाला लावून एकमेकांना वाचवणारे. एसएस राजामौली यांचा हा चित्रपट खूप आवडला होता, या चित्रपटाची सर्वात खास गोष्ट म्हणजे राम-भीमची मैत्री.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे