लोकशाही स्पेशल

World Printing Day: जाणून घ्या 'जागतिक मुद्रण दिनाचा' इतिहास!

दर वर्षी 24 फेब्रुवारी 'जागतिक मुद्रण दिवस 'म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मुद्रणकलेचे जनक योहान्स गुटेनबर्ग ह्यांच्या जन्मदिनाप्रीत्यर्थ साजरा करण्यात येतो.

Published by : Team Lokshahi

दर वर्षी 24 फेब्रुवारी 'जागतिक मुद्रण दिवस 'म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मुद्रणकलेचे जनक योहान्स गुटेनबर्ग ह्यांच्या जन्मदिनाप्रीत्यर्थ साजरा करण्यात येतो. जर्मनींतील गुटेनबर्ग यांनी अक्षराचे सुटे खिळे बनविण्याचा आणि टाईपसह छपाई यंत्राचा शोध देखील लावला. बायबल या ग्रंथाची छपाई करणारे देखील गुटेनबर्ग होते. इ.स. 1434 ते 1439 हा काळ मुद्रण क्षेत्रासाठी महत्त्वाचा काळ होता या काळातच गुटेनबर्गांनी 'धात्वलेखी मुद्रणाचा शोध लावला. उपकरणे म्हणून कागद, शाई आणि मुद्रण प्रतिमा हेच वापरण्यात येत होते. कोरीव मजकुरावर शाई लावून त्यावर ओलसर कागद ठेवून मुद्रणाचा ठसा उमटवायचे. या मुद्रणेच्या पद्धतीमध्ये खूप अडचणी आल्या, अक्षरे वाकडे दिसायचे.

भारतामध्ये मुद्रण कला 1556 साली आली सर्वप्रथम गोव्यात पुर्तगाल मधून छापखाना जहाजाने आला. महाराष्ट्रात ही कला 1882 साली आली अमेरिकन मिशेन ने या मुद्रणाची सुरुवात केली या साठी त्यांनी श्रीरामपुरातून देवनागरी लिपीचे खिळे आणले या मुद्रणालयात काम करणारे टॉमस ग्रॅहम मातृका तयार करण्यास शिकले त्यांनी देवनागरी आणि गुजरातीचे सांचे बनवून मातृका तयार केल्या. त्यांच्या कडून गणपत कृष्णाजी पाटील हे अमेरिकन मिशनचे होते मातृका बनविण्यास शिकले आणि स्वतःचे मुद्रणालय 1827 रोजी सुरू केले.

मुद्रण कलेचा विकास झाल्यावर संगणकावरून कमांड देऊन मुद्रण तंत्र विकसित झाले. त्यामुळे मुद्रण कमी वेळात पूर्ण होणे शक्य झाले. कालांतरानंतर इंटरनेटचा विकास झाला आणि मीडिया विकसित झाला. त्यामुळे आपण सहजरित्या टाईप करू शकतो.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी