दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी हा दिवस पाळला जातो. यंदा 9 मार्च रोजी नो स्मोकिंग डे (No Smoking Day ) साजरा करण्यात येत आहे. नो स्मोकिंग डे हा एक आरोग्य जागरूकता दिवस आहे. ज्यांना धूम्रपान सोडण्याची इच्छा आहे त्यांना मदत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तंबाखू खाल्यामुळे आरोग्यावर होणाऱा घातक परिणामाविषयी जनजागृती करणे आणि इतरांना ही धोकादायक सवय लावण्यापासून थाबंवणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हा दिवस प्रथम युनायटेड किंग्डममध्ये (United Kingdom) बुधवारी साजरा करण्यात आला,
नो स्मोकिंग डे हा जागतिक तंबाखू विरोधी दिनापेक्षा वेगळा आहे, हा डब्ल्यूएचओच्या (WHO) 11 अधिकृत जागतिक सार्वजनिक आरोग्य मोहिमेपैकी -एक आहे. जगभरात दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू दिन साजरा केला जातो. जगभरात धूम्रपान न करणाऱ्यांसाठी आणि धूम्रपान न करणाऱ्यांसाठी हा दिवस साजरा केला जातो.
धूम्रपान पीरियडॉन्टायटीस (Periodontitis) होतो. ज्यामुळे दात पडण्याची शक्यता आहे. तंबाखूमुळे हिरड्यांचा संसर्ग होऊन दातांना आधार देणारा हाड नष्ट होतो.
धूम्रपान केल्याने एम्फिसीमा (Emphysema) ,न्यूमोनिया (pneumoniae) आणि क्रॉनिक ब्रॉन्कायटीस (Chronic bronchitis) सारख्या फुफ्फुसांचे आजार होण्याचा धोका वाढतो.
चीनमध्ये Chin ३०० दशलक्ष धूम्रपान करणार् यांचे घर आहे जे वर्षाकाठी अंदाजे १.७ ट्रिलियन सिगारेट किंवा प्रति मिनिट अंदाजे ३० दशलक्ष सिगारेट वापरतात.
धूम्रपान सोडण्यासाठी काय करावे
धूम्रपानाच्या दुष्परिणामांबाबत सविस्तर माहिती देणारे व्हिडीओ पाहा, पॉडकास्ट (Podcast) ऐका.
निकोटीनची (Nicotine) तल्लफ कमी करण्यासाठी कॅफेनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
थकव्यामुळे निकोटीनची तीव्र इच्छा निर्माण होते. त्यामुळे दररोज पुरेशी विश्रांती घ्या. निरोगी जीवनशैलीचे पालन करा.
आपले शरीर हायड्रेटेड (Hydrated) ठेवा आणि नियमित व्यायम करा.
निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी घ्या.