लोकशाही स्पेशल

दिनविशेष 1 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 1 February 2024 : सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 1 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१३: जागतिक बुरखा हिजाब दिनाची स्थापना करण्यात आली.

२००४: मक्का हज यात्रेतील चेंगराचेंगरीत २५१ निधन तर २४४ लोक जखमी झाले.

२००३: अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीर मृत्यूमुखी.

१९९२: भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन ऍंडरसन याला फरारी घोषित केले.

१९८१: ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्याचेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.

१९६६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करुन प्रायोपवेशनास प्रारंभ केला.

१९५६: सुधीर रंजन दास यांनी भारताचे ५वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

१९४६: नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.

१९४२: व्हॉइस ऑफ अमेरिका - हे रेडिओ केंद्र सुरु झाले.

१९४१: डॉ. के. बी. लेले यांनी गुरुकिल्ली हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.

१८९३: थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.

१८८४: ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.

१८३५: मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत.

आज यांचा जन्म

१९७१: अजय जडेजा - भारतीय क्रिकेटपटू

१९६०: जॅकी श्रॉफ - अभिनेते

१९३९: डॉ. कल्लाम अंजी रेड्डी - डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे संस्थापक - पद्म विभूषण, पद्मश्री (निधन: १५ मार्च २०१३)

१९२९: जयंत साळगावकर - कालनिर्णय कॅलेंडरचे संस्थापक (निधन: २० ऑगस्ट २०१३)

१९२७: मधुकर हातकणंगलेकर - ज्येष्ठ समीक्षक (निधन: २५ जानेवारी २०१५)

१९१७: ए. के. हनगल - चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक (निधन: २६ ऑगस्ट २०१२)

आज यांची पुण्यतिथी

२०२३: परिमल डे - भारतीय फुटबॉलपटू (जन्म: ४ मे १९४१)

२०१२: अनिल मोहिले - संगीतकार व संगीत संयोजक

२००३: कल्पना चावला - भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (जन्म: १७ मार्च १९६२)

१९४८: जतिंद्रमोहन बागची - भारतीय कवि आणि समीक्षक (जन्म: २७ नोव्हेंबर १८७८)

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे