प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. जून महिना सुरु झाला आहे. या जून महिन्यात देखिल वेगवेगळ्या दिवसाचे वेगवेगळे महत्व आहे. चला तर आम्ही तुम्हाला 5 जून या दिवसाचे दिनविशेष सांगणार आहोत.
5 जून : जागतिक पर्यावरण दिन
आज जागतिक पर्यावरण दिन हा दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून हा दिवस साजरा केला जातो.
1881 : हार्मोनियम वादक, अभिनेते गोविंदराव टेंबे यांचा जन्म.
मराठी संगीत रंगभूमीवरील अनेक नाटकांना त्यांनी संगीत दिले आहे. अयोध्येचा राजा या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली होती.
1980 : भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
1952 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही सन्मान पदवी दिली.
1975 : 1967 पासून आठ वर्ष वाहतूकीसाठी बंद असलेला ‘सुवेझ कालवा’ पुन्हा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.