संकेत माने
आपल्या दैनंदिन जीवनात फोनचे बिल, गॅस बिल, लाईट बिल तसेच वेगवेगळ्या गोष्टींचे थकीत पेमेंट करण्यासाठी आपण विविध UPI ॲप्सचा वापर करत असतो. UPI ॲप्सचा वापर करून पेमेंट करणे हल्ली सोपे झाले असले, तरी याचा वापर करताना आपल्याला खबरदारी घेणे आवश्यक ठरते. अन्यथा या मार्गाचा वापर करताना जर काही त्रुटी राहिल्या, तर एखाद्या सायबर फ्रॉडमध्ये (cyber fraud) अडकून आपण आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता असते. सायबर गुन्ह्यांची (Cybercrime) वाढती संख्या पाहता UPI ॲप्सचा वापर करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील बाबींकडे लक्ष द्यावे.
१. UPI ID मध्ये बदल करणे:
जेव्हा आपण एखादे UPI ॲप इन्स्टॉल (Install) करतो आणि आपले बँक अकाउंट त्यामध्ये समाविष्ट करत असतो तेव्हा आपल्याला UPI ID सेट करण्याची विचारणा केली जाते. परंतु आपण तिकडे लक्ष न देता सहज पुढे नेक्स्ट करून जातो आणि त्यामुळे आपल्याला डिफॉल्ट UPI ID देण्यात येतो. बहुतांश लोकांचे UPI ID हे त्यांचे फोन नंबर असतात (उदा. १२३४५६७८९०@ybl किंवा mobilenumber@oksbi) त्यामुळे अधिक सुरक्षीततेकरिता आजच आपल्या UPI ID मध्ये बदल करून घ्या. जेणेकरून इतर कोणीही तुमच्या चा अंदाज लावून पेमेंट रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही.
२. अपडेटेड UPI ॲप्सचा वापर:
तुम्ही वापरात असलेले अप्लिकेशन (Application) हे लेटेस्ट अपडेटेड व्हर्जनवर (version) कार्यरत आहे का याची खातरजमा नक्की करून घ्यावीत. BHIM हे अप्लिकेशन वगळता इत्तर सर्व अप्लिकेशन हे खासगी कंपन्यांद्वारे विकसित केले गेलेले आहेत (उदा: फोन पे, गुगल पे, एरटेल पे इत्यादी.) ह्या कंपन्या वेळोवेळी आपल्या ॲप्समध्ये टेक्निकल बदल करत असतात आणि आपल्याला वेळोवेळी अप्लिकेशन अपडेट करण्याचा सल्ला देतात. त्याचप्रमाणे कोणतेही ॲप्स डाउनलोड आणि अपडेट करताना ते प्ले स्टोर चाच वापर करावा. इतर कोणत्याही साईटवरून APK FILE डाउनलोड करू नका.
३. Multiple UPI Apps चा वापर करणे टाळा:
विविध UPI अँप्स बनवणाऱ्या कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स आणि कॅशबॅक देतात आणि हे पाहून आपण त्यांच्या जाळ्यात अडकतो आणि खूप सारे UPI Apps इन्स्टॉल करून त्यामध्ये आपल्या गोपनीय आणि आर्थिक माहितीचा तपशील देतो. त्यामुळे नकळत आपल्याकडून Multiple UPI ID & बँक अकाउंट ऍड केले जातात. ज्या UPI अप्लिकेशनची तुम्हाला संपूर्ण माहिती आहे. त्याच ॲपचा वापर करून आपण आर्थिक व्यवहार करायला हवेत.
४. UPI ॲप आणि पिन सुरक्षित करणे:
तुमच्या UPI अँप ला जर पासवर्ड लॉक नसेल तर लवकरात लवकर स्क्रीन लॉक लावून UPI ॲप सुरक्षित करून घ्यावेत. त्याचप्रमाणे तुमचा UPI पिन हा अत्यंत महत्वाचा आहे तो इतरांसोबत शेअर करू नका तसेच तुमच्या मोबाईल डिवाइस मध्ये देखील कुठे सेव्ह करू नका. सार्वजनिक ठिकाणी पिन टाकून व्यवहार करताना अधिक काळजी घ्यावीत. QR Code, VPA किंवा अन्य कोणत्याही मार्गाने UPI चा वापर करून पैसे पाठवताना एकदा समोरच्या व्यक्तीचा तपशील पडताळून घ्या आणि नंतरच पैसे पाठवा.
५. UPI Wallet मध्ये पैसे ठेवू नका:
वेगवेगळ्या UPI अँप्स चे आपले स्वतंत्र UPI वॉलेट देखील असते आणि त्यांच्याकडून वेळोवेळी त्यामध्ये पैसे ऍड करण्यासाठी त्याचा वापर करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त केले जाते. परंतु अशा वॉलेट चा वापर न करता डायरेक्ट बँकेतून पैसे पाठवा किंवा पेमेंट करा. यामुळे जर कोणत्या थर्ड पार्टी ॲप्सवर Reserve Bank of India कडून काही बंधन आणली गेली तरी तुम्ही वॉलेटचा वापर करत नसल्याने तुमचे पैसे अडकले जाणार नाही आणि जेव्हाही आपण कोणतेही UPI ट्रान्सक्शन (Transaction) करतो त्याचा तपशील आपल्याला आपल्या बँक स्टेटमेंटमध्ये पाहायला मिळतो.
६. Unverified लिंक्स वर क्लिक करू नका:
तुम्हाला SMS, ई-मेल अथवा अन्य कोणत्याही मार्गाने काही हायपर लिंक पाठवल्या गेल्या असतील तर त्यावर अजिबात क्लिक करू नका. असे केल्याने तुमचा UPI ॲप उघडला जाईल आणि जर तुम्ही अशावेळी त्याच्या जाळ्यात सापडला तर तुम्हाला आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.
लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.