Health Team Lokshahi
लाईफ स्टाइल

चेहऱ्यासाठी झोपण्यापूर्वी 'या' तेलाचा करा वापर; जाणून घ्या फायदे

चेहऱ्यासाठी झोपण्यापूर्वी 'या' तेलाचा करा वापर; जाणून घ्या फायदे

Published by : prashantpawar1

आपल्या चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात, पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात आपली त्वचा वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देते. त्यामुळे ती अनेकदा कोरडी आणि निर्जीव देखील दिसायला लागते. जर तुम्ही चेहऱ्यावरील रंग कमी झाल्याकारणाने किंवा डागांमुळे त्रस्त असाल तर नारळाचे पाणी प्यायल्याने तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. पण निरोगी त्वचेसाठी खोबरेल तेलाचा वापरही खूप प्रभावी मानला जातो. खोबरेल तेलामध्ये अँटीफंगल गुणधर्म आढळतात ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. हे नैसर्गिक तेल अनेक प्रकारे वापरले जाते. जर तुम्ही ते तुमच्या त्वचेवर रोज लावले तर ते तुमच्या त्वचेवरला अनेक फायदे होतील. (Use oil for face Know the benefits)

1. ग्लो साठी
खोबरेल तेल मृत त्वचा काढून टाकून रंग उजळते आणि त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर खोबरेल तेलात एक चमचा दही मिसळून फेस पॅक बनवा आणि चेहऱ्यावर मसाज करताना लावा. आता ३० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचेला अप्रतिम ग्लो येतो. खोबरेल तेलाच्या मदतीने स्ट्रेच मार्क्स देखील काढता येतात.

2. डाग दूर करण्यासाठी
तुमच्या त्वचेचा रंग सुधारण्यासाठी नारळाच्या तेलात लिंबाचा रस, ग्लिसरीन आणि गुलाबपाणी मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. आता अर्धा तास तसाच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. असे आठवड्यातून 3 दिवस करा तुम्हाला उत्तम परिणाम दिसेल.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी