लाईफ स्टाइल

Gold Price Today: घसरणीनंतर सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ, वाढीनंतर हा आहे 10 ग्रॅमचा दर

गेल्या काही दिवसांत सोन्याच्या विक्रमी पातळीपर्यंत घसरण झाल्यानंतर आता त्यात वाढ पाहायला मिळत आहे.

Published by : shweta walge

गेल्या काही दिवसांत सोन्याच्या विक्रमी पातळीपर्यंत घसरण झाल्यानंतर आता त्यात वाढ पाहायला मिळत आहे. लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच असतात. गेल्या काही दिवसांत धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याची विक्रमी विक्री झाली होती. त्यावेळी सोन्याचे दर आणखी वाढण्याची अपेक्षा होती. गुरुवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात संमिश्र कल दिसून आला.

सोन्याचा विक्रमी दरात वाढ

एमसीएक्स आणि सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आणि चांदीची घसरण झाली. सोन्याच्या किमतीत हळूहळू वाढ होत असल्याने त्याची वाटचाल विक्रमी दराकडे होत आहे. मल्टि-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर गुरुवारी दुपारी 12 वाजता सोन्याचा भाव 119 रुपयांनी वाढून 51625 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​होता. त्याच वेळी चांदीचा भाव 78 रुपयांनी घसरून 61607 रुपये प्रति किलोच्या पातळीवर दिसून आला.

सत्राच्या सुरुवातीला एमसीएक्सवर सोने 51506 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 61561 रुपये प्रति किलोवर बंद झाली. गेल्या दिवशी सोन्याचा भाव विक्रमी घसरून 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र त्यानंतर आता दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे.

चांदीचा दर

सराफा बाजारात इंडिया बुलियन असोसिएशनने (https://ibjarates.com) जाहीर केलेल्या किमतीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 105 रुपयांनी वाढून 51619 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याचवेळी 999 शुद्धतेची चांदी 61248 रुपये प्रतिकिलोवर घसरली. 23 कॅरेट सोन्याचा दर 51412 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट 47283 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटचा दर 38714 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी