Fruits Lokshahi team
लाईफ स्टाइल

'ही' 5 फळे खाल्ल्यानंतरही चुकूनही पिऊ नका पाणी...

तुम्ही लहान असो वा मोठे फळे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानंतर आपल्याला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.बहुतांश लोक फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिण्याची चूक करतात. पण ही चूक खूप महागात पडू शकते, हे आपल्या लक्षातच येत नाही.

Published by : Rajshree Shilare
Banana

केळी(Banana) खाल्ल्याने शरीरात चरबी वाढते. पण तुम्हाला माहित आहे का, केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास शरीरातील फॅट अचानक बदलतात. तसेच शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढते. रक्तातील साखरेची पातळीही वाढते. त्यामुळे केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.

Apple

सफरचंदात (apple)भरपूर प्रमाणात फायबर असते. ते खाल्ल्यानंतर पूर्ण जेवण झाल्यासारखे वाटते. दीर्घकाळ पोट भरलेले असते. परंतु तुम्ही सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायले तर हा फायबर तुमच्या आतड्यांपर्यंत पोहोचत नाही. लघवीद्वारे फायबर शरीराच्या बाहेर फेकले जाते. तसेच सफरचंद खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास पचनसंस्था नीट काम करू शकत नाही. अन्नाचे पचन व्यवस्थित न झाल्याने तुम्हाला गॅस आणि ॲसिडिटीचा(Acidity) त्रास होऊ शकतो.

Muskmelon

टरबूज व्यतिरिक्त उन्हाळ्यात खाल्ले जाणारे दुसरे सर्वात रसाळ आणि स्वादिष्ट फळ म्हणजे खरबूज(Muskmelon) . टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच खरबूजमध्ये देखील नैसर्गिक साखर असते. त्यामुळे पाण्याने भरलेल्या फळांवर पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित आजार डोके वर काढतात. एवढेच नाही तर खरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने शरीराची पीएच पातळीही बिघडू शकते.

Java plum

जांभूळ (Java Plum)हे डायबिटीजच्या रुग्णांसाठी एक हेल्दी फळ आहे. खरोखरच अनेकांना आवडणारे ते सर्वोत्तम फळ आहे. यामध्ये असणारा नैसर्गिक गोडपणा तुमच्या शरीरातील साखर नियंत्रित करतो. पण जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. कारण यामुळे तुम्हाला खोकला किंवा सर्दी होऊ शकते.

Watermelon

टरबूज(watermelon) हे उन्हाळ्यात खाल्ले जाणारे सामान्य फळ आहे. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाणही जास्त असते. या फळामध्ये फ्रक्टोज म्हणजेच नैसर्गिक साखर देखील असते. त्यामुळे तुम्ही टरबूज खाल्ल्यानंतर पाणी पितात आणि फ्रक्टोज थेट तुमच्या पोटात पोहोचते. त्यामुळे तुम्हाल पोटाचे विकार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे टरबूज खाल्ल्यानंतर किमान एक तास आधी किंवा एक तास पाणी पिऊ नये.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी