उन्हाळा जर कोणाचा आवडता ऋतू असेल तर त्यामागील सर्वात मोठे कारण असते आंबा. लहान-मोठे सर्वच जण आवडीने आंब्याचे आईसक्रीम, शेक किंवा आंबा कापून खातात. मात्र कित्येकदा आंबा खाल्यानंतर आपण चुकून काही पदार्थ खातो त्याच्यामुळे आरोग्याला नुकसान पोहचवू शकते.आंबासोबत हे पदार्थ खाऊ नये.
कोल्ड ड्रिंकसोबत आणि हॉट ड्रिंकचे देखील आंब्यासोबत सेवन करू नये, त्यामुळे आरोग्यावर खूप विपरित परिणाम होऊ शकतो.
कारले (Bitter Gourd) आंबा खाल्ल्यानंतर लगेच कारले खाल्यामुळे पोट बिघडू शकते ज्यामुळे उल्टी येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चक्कर येणे अशा समस्या होऊ शकतात.
दही (Curd) आंबाच काय कोणतेही फळ खाल्यानंतर दही खाणे टाळले पाहिजे. फळांसोबत दह्यांचे सेवन केल्यास सर्दी आणि ॲलर्जीसाठी कारणीभूत ठरू शकते.
पाणी( Water) आंबा खाल्यानंतर लगेच पाणी प्यायले नाही पाहिजे. त्यामुळे पोटामध्ये दुखू शकते. आंबा खाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायले पाहिजे