Pashchim Maharashtra

छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो ऐवजी छत्रपती संभाजी राजेंचा फोटो ‘सारथी’चा प्रताप

Published by : Lokshahi News

अमोल धर्माधिकारी, पुणे

9 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 392 वी जयंती आहे. सारथी संस्थेने महाराष्ट्रात 'शिवजयंती' निमित्त Online 'वक्तृत्व स्पर्धा' ठेवण्यात आली आहेत. सर्व स्पर्धकांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे.

ही स्पर्धा ऑनलाईन असून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त तरुणांनी यात सहभागी व्हावे अशी अपेक्षा आहे. परंतु भलतीच नजर चूक झालेली आहे. 'शिवजयंती' संदर्भात सारथी संस्थेने महाराष्ट्रात अधिकृत वेबसाईटवर सदर वक्तृत्व स्पर्धेचे बॕनर (डिझाईन) प्रसिद्ध केले आहे.

सदर वेबसाईट सारथी संस्था अर्थात राज्य सरकारची आहे. यावर मा. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींचे फोटो सुद्धा आहेत. असे असताना नजरचुकीने का होईना राज्य सरकारच्या अधिकृत संस्थेकडून (छत्रपती शाहू महाराज यांच्या नावे असणाऱ्या संस्थेकडून) अशी चूक होणे योग्य नाही.

अधिकारी झोपेत काम करतात का…? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सारथी संस्थेचे कारभारी कधीच ऐकून घेण्याच्या मानसिकतेचे नाहीत. हेकेखोरपणा करण्याच्या नादात ते स्वतःचा शहाणपणा नेहमी पाजळत असतात आणि त्यांच्या बुद्धीचे उत्तम उदाहरण म्हणजे ही चुकीच्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या ऐवजी संभाजी महाराजांचा फोटो छापणे हे कृत्य महाराष्ट्रात तरी चुकीचा आहे. असं सांगत संभाजी ब्रिगेडच्या वतीने या प्रकरणाचा जाहीर निषेध करण्यात आलाय.

सारथी संस्थेने तात्काळ चूक सुधारावी आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रसिद्ध करावा. अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केलीय.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी