देशामध्ये कमी खर्चात आणि जलद गतीने कुठेही जाण्याचे सोप्पे मार्ग म्हणजे रेल्वे (Railway). देशभरात रेल्वेने प्रवास करणारऱ्यांची संख्यां मोठी आहे. तुम्ही देखील रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडे रेल्वेने प्रवास करण्यासाठी कन्फर्म तिकीट (Railway Ticket) नसेल तर काळजी करु नका. कारण इंडिया रेल्वे कॅटरिंग अॅड टुरिझम कॉर्पोरेशनने IRCTC प्रवाशांसाठी नवीन सुविधा सुरु केली आहे. या सुविधेनुसार आता कन्फम तिकीट मिळवणे सोपे झाले आहे. तुम्ही प्रवास करणार असलेल्या ट्रेन Train मध्ये किंवा इतर कुठल्याही ट्रेनमध्ये सिट रिकामी झाली की तुम्हाल लगेच माहिती मिळेल. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कन्फर्म तिकीट (Confirm ticket) बुक करु शकाल.
काय आहे नवीन सुविधा
नुकतेच इंडियन रेल्वे कॅटरिग अॅड टुरिझम कॉर्पोरेशनने आपल्या वेबसाईटवर (website) नविन सुविधा अपडेट (Update) केल्या आहे. यातील एक पुश नोटिफिकेशन सुविधा सुरु झाली आहे. त्यानुसार IRCTC ची सुविधा वापरणाऱ्या युजर्सना सीट उपलब्धतेची माहिती मिळणार सोबतच विविध प्रकारच्या सुविधांचीही माहिती मिळणार आहे. युजर्सना पुश नोटिफिकेशनचा (notification) फायदा असा होईल की, जेव्हा एखादी सीट कुठल्याही ट्रेनमध्ये रिकामी होईल तेव्हा सीट रिकामी झाल्याचे नोटिफिकेशन युजर्सच्या मोबाईलवर जाईल. या सुविधेचा वापर करत युजर्सला कन्फर्म तिकीट बुक करताना मदत होणार आहे.