कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर जर काही कारणास्तव आपल्याला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं तर विमा कंपन्या त्याचा खर्च उचलतील का? असा सवाल काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला होता. यावर आता भारतीय विमा नियामक मंडळ आणि विकास प्राधिकरणाने आदेश दिले आहेत.
आयुर्विमा असणाऱ्या व्यक्तीने कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर त्या व्यक्तीस आरोग्यसंबधित कोणत्याही समस्या निर्माण होऊन ती व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्यास. त्या व्यक्तीचा सर्व खर्च विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. असे आदेश भारतीय विमा नियामक मंडळ आणि विकास प्राधिकरणाने आदेश दिले आहेत.
लसीकरणानंतर काही समस्या निर्माण झाल्यास आरोग्य विम्याअंतर्गत त्याचा लाभ घेता येईल. यासाठी विमा कंपन्यांनी पहिल्यापासून जे नियम आणि अटी सांगितल्या असतील त्याचं त्यांना पालन करावं लागेल असे देखील IRDAI यावेळी स्पष्ट केले. तर दुसरीकडे सरकारी विमा कंपनी एलआयसीनं कोविड संकटामुळे समस्येचा सामना करत असलेल्या आपल्या ग्राहकांसाठी सेटलमेंट प्रक्रिया सोपी केली आहे. पॉलिसी मॅच्युअर झाल्याचे आणि त्याच्याशी निगडीत कागदपत्र ग्राहकांना कोणत्याही शाखेत जमा करता येणार असल्याचं एलआयसीनं म्हटलं.