देशात बहुचर्चित राहिलेल्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा आज निकाल लागणार होता. या प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झाले असून पीडितेच्या कुटुंबियाना दोन वर्ष निकालाची वाट बघावी लागली आहे. कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन राहिल्याने न्यायालयीन कामकाज ठप्प झाले होते यामुळे या प्रकरणाला दोन वर्षे लागली.
या जळीतकांड प्रकरणाचा निकाल उद्या येणार आतापर्यंत 29 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे. आरोपी विकेश नगराळे दोषी असून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.
एकतर्फी प्रेमातून घडला थरार
हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील प्राध्यापिकावर एकतर्फी प्रेमप्रकरणातून विक्की उर्फ विकेश नगराळे यांनी अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आले.ही घटना 3 फेब्रुवारी 2020 ला नंदोरी चौकात घडली होती. पीडित ही 90 टक्के भाजली होती.तिला तात्काळ नागपूर येथील ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सात दिवस पीडितेवर उपचार सुरू असताना10 फेब्रुवारीला पहाटे 6 वाजून 55 मिनिटांनी तिची मृत्यूशी झुंज संपली. पीडितेचा मृत्यूची माहिती समजताच कुटुंबियांकडून आक्रोश केला होता. तर मृतदेह गावात आणताना यावेळी गावात पोलीस नागरिकांत चकमक झाली होती. पीडितेच्या अंत्यसंस्कार वेळी हजारोच्या संख्येत नागरिक उपस्थित होते यावेळी गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.