अँटी ऑक्सिडंट्सनी समृद्ध, गुलाब पाणी केवळ चेहऱ्याची चमकच वाढवत नाही, तर चेहऱ्याला पोषण देखील देते. गुलाबाचे पाणी उत्कृष्ट क्लीन्सर, मेकअप रिमूव्ह म्हणून देखील काम करते. ते चेहऱ्यावरील धूळयुक्त मातीचे कण काढून टाकते. गुलाबाचे पाणी गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांमधून नैसर्गिकरित्या मिळते. हे कॉस्मेटिक आणि आरोग्य फायद्यांसाठी वापरले जाते. गुलाबाच्या पाण्यात सौम्य सुगंध असतो, त्यामुळे त्याचा वापर अत्तर बनवण्यासाठी केला जातो. गुलाबाच्या पाण्याचे तुमच्या त्वचेसाठी अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया ते त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे.
गुलाब पाणी का Use करतात? जाणून घ्या...
1. गुलाब पाणी चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याचा सुरकुत्यापासून बचाव करते.
2. अँटी ऑक्सिडंट्सनी समृद्ध, गुलाब पाणी केवळ चेहऱ्याची चमकच वाढवत नाही, तर चेहऱ्याला पोषण देखील देते.
3. गुलाबाचे पाणी उत्कृष्ट क्लीन्सर, मेकअप रिमूव्ह म्हणून देखील काम करते. ते चेहऱ्यावरील धूळयुक्त मातीचे कण काढून टाकते.
4. दररोज रात्री कापसाच्या सहायाने चेहऱ्यावर गुलाब पाणी लावले तर दिवसभर बसलेली धूळ आणि चेहऱ्यावरील ऑइल कमी होण्यास नक्की मदत होईल.
5. गुलाब पाण्याने त्वचा नियमित स्वच्छ केल्यामुळे त्वचेच्या आतील धूळ माती निघून जाते.
6. यासोबतच तुमच्या त्वचेतील ओलावादेखील काय, चेहऱ्याला पुरेशी आर्द्रता मिळाल्याने तुमच्या त्वचेला एक प्रकारचा तजेदारपणा येतो.