आरोग्य मंत्रा

Benefits of Bhujangasana : दररोज न चुकता करा भुजंगासन, 'हे' आहेत फायदे

योगसाधनेतील प्रत्येक आसनाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतात.

Published by : Team Lokshahi

योगासने हा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असा व्यायाम आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. योगसाधनेतील प्रत्येक आसनाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतात. भुजंगासन हे योगसाधनेतील एक आसन असून या आसनाचे अनेक फायदे होतात. सूर्य नमस्कारातही भुजंगासनाचा समावेश आहे. भुजंगासनाचा मुख्य परिणाम हा पोटाच्या आणि पाठीच्या स्नायुंवर होतो. भुजंगासनामुळे पोटाचे स्नायू सक्रीय होतात तर पाठीचे स्नायू मजबूत होतात. भुजंगासनामुळे रक्तप्रवाह सुधारतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी भुजंगासन करण्याला विशेष महत्व आहे.

भुजंगासन कसे करावे?

भुजंगासन करताना पोटावर झोपावं. दोन्ही पाय जवळ जवळ ठेवावेत. दोन्ही हात छातीच्या बाजूने जमिनीवर टेकवून ठेवावेत. हनुवटी जमिनीला टेकलेली असावी. लांब श्वास घेत दोन्ही हातांवर भार देत वर उठावं. नजर वर छताकडे ठेवावी. आसन सोडताना श्वास सोडत हळूहळू पोटाचा, छातीचा भाग जमिनीला टेकवावा आणि सगळ्यात शेवटी कपाळ जमिनीला टेकवावे. असे हे भुजंगासन करायला अतिशय सोपे असून त्यासाठी फारसा वेळही लागत नाही.

आसनाचे फायदे

१. शरीरात चयापचयाची क्रिया बिघडली तर किडनी विकार, फॅटी लिव्हर यासारख्या समस्या निर्माण होतात. भुजंगासनामुळे चयापचयाची क्रिया सुधारते. शरीरातला रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळेच किडनी आणि यकृताचं काम सुरळीत ठेवण्यासाठी भुजंगासनाचा उपयोग होतो.

२. भुजंगासन केल्यानं पोटाचे स्नायू ताणले जातात त्यामुळे वाढलेलं पोट नियमित भुजंगासन केल्यानं कमी होतं. तसेच संपूर्ण शरीराचं वजन नियंत्रित करण्याचं काम भुजंगासन करतं. म्हणूनच वजन कमी करण्याच्या उपायांमध्ये भुजंगासन करण्यास सांगितले जाते.

३. भुजंगासन हा एक स्ट्रेचिंग व्यायाम आहे. हे आसन केल्याने शरीरात एकप्रकारचा ताण निर्माण होतो. अशाप्रकारे ताण निर्माण करणाऱ्या व्यायामामुळे खांदे, पाठ आणि मान या अवयवांना आराम मिळतो. दिवसभर बैठे काम असणाऱ्यांना पाठदुखीची समस्या उद्भवते. अशावेळी पाठीचे स्नायू मजबूत आणि लवचिक करण्याचं काम भुजंगासन करतं.

४. सायटिका, दमा यासरख्या समस्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी भुजंगासनाचा उपयोग होतो. भुजंगासन करताना पोट ताणलेलं असताना चालू असलेल्या मंद श्वसनाचा उपयोग फुप्फुसांचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो. या आसनामुळे फुप्फुसं मजबूत होतात आणि श्वसनक्रियेसाठी याचा चांगला फायदा होतो.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी