आठवड्यातील दुसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 09:15 वाजता सोन्याचे दर 0.32 टक्क्यांनी घसरले आहेत. यानंतर सोन्याचे दर 47,933 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर चांदीचे दरही मंगळवारी उतरले आहेत.
3 ऑगस्ट रोजी चांदी 0.53 टक्क्यांनी कमी होऊन दर 67,528 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. असे असले तरीही रेकॉर्ड लेव्हलपेक्षा सोन्याचे दर 8,200 रुपयांनी कमी आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर जवळपास 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते.
मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,380 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा दर 48,380 रुपये आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,400 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,100 रुपये आहे. चेन्नईमध्ये दर 45,350 (22 कॅरेट) आणि 49,490 रुपये (24 कॅरेट) प्रति तोळा आहे EMI वर खरेदी करा स्वस्त सोनं EMI वर सोनंखरेदीचा पर्याय उत्तम ठरू शकतो. तुम्हाला एखादा दागिना आवडला असेल पण पैसे कमी पडत असतील तर AUGMONT तुम्हाला EMI वर दागिने खरेदी करण्याचा पर्याय देत आहे.