एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्षाची सुरूवात होते. यंदाचा एप्रिल महिना मात्र जरा जास्तच खास असणार आहे. कारण यंदा (1st April 2022) पासून असे अनेक मोठे बदल होणार आहेत. त्याचा परिणाम तुमच्या खिशावर, आर्थिक बाबींवर होणार आहे. (Changes from April)आजपासून होणाऱ्या मोठ्या बदलांबद्दल माहिती देत आहोत.
पीएफ खात्यावर कर
केंद्र सरकार 1 एप्रिलपासून नवीन प्राप्तिकर कायदा लागू करणार आहे. यामुळे पीएफ खाते (PF Account) दोन भागांमध्ये विभागले जाऊ शकते, ज्यावर कर देखील आकारला जाईल. नियमांनुसार, ईपीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त असणार आहे. परंतु त्यापेक्षा जास्त योगदान दिल्यास व्याज उत्पन्नावर कर आकारला जाईल. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीपीएफमध्ये करमुक्त योगदानाची मर्यादा वार्षिक 5 लाख रुपये आहे.
पोस्ट ऑफिस नियम
पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये (Small Savings Schemes) गुंतवणूक योजनेत बदल होणार आहेत. 1 एप्रिल 2022 पासून, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि मुदत ठेव खात्यांवरील व्याजाचे पैसे फक्त बचत खात्यात मिळतील. तसेच बचत खाते लिंक केल्यावर, व्याजाचे पैसे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित केले जातील. सरकारने MIS, SCSS, टाइम डिपॉझिट खात्यांच्या बाबतीत मासिक, त्रैमासिक, वार्षिक व्याज जमा करण्यासाठी बचत खाते वापरणे अनिवार्य केले आहे.
https://lokshahi.live/mask-mandatory-rule-cancel-in-maharashtra-see-new-guidelines/
औषधांच्या किंमती वाढणार
पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरससह अत्यावश्यक औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून वाढणार आहेत. शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.
म्युच्युअल फंडासाठी नियम
म्युच्युअल फंडातील (Mutual Funds) गुंतवणुकीचे पैसे 1 एप्रिलपासून चेक, बँक ड्राफ्ट किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे करता येणार नाहीत. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी UPI किंवा नेटबँकिंगद्वारे पैसे द्यावे लागतील.
वाहनांच्या किंमती वाढवणार
काही मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 2.5 टक्क्यांनी वाढवणार असल्याचे म्हटले आहे. मर्सिडीज-बेंझ इंडियानेही वाहनांच्या किमती तीन टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. टोयोटाने किमतीत चार टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. दुसरीकडे, BMW 3.5 टक्क्यांनी किमती वाढवण्यात आली आहे.
गृह कर्जावरील अतिरिक्त सवलत नाही
आयकर कायद्यात कलम 80EEA नवीन जोडले होते. या कलमांतर्गत प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांना गृहकर्जाच्या व्याजावर दीड लाख रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त करमुक्तीचा लाभ दिला जाईल. हा लाभ कलम 24 अंतर्गत कमाल 2 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजावर कर सूट मिळेल.
LPG च्या किमती वाढणार
1 एप्रिल रोजी पुन्हा एकदा नवीन दर जाहीर होणार असून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 ते 100 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. 6 ऑक्टोबर 2021 रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर शेवटच्या वेळी बदलण्यात आले होते.
खाद्यपदार्थ महाग होणार
1 एप्रिलपासून खाद्यपदार्थ महाग होण्याची शक्यता आहे. अंडी, मांस आणि दूध यासारखे पदार्थ महागणार आहेत. तसेच कोकाकोला आणि पेप्सिकोलाने देखील किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. ओरियो कुकीज, रिट्स क्रॅकर्स आणि सॉर पॅच किड्स 2022 हे देखील महाग होणार आहे.
क्रिप्टोकरन्सीवर कर
क्रिप्टोकरन्सीवरील कर हा एक मोठा बदल आहे. 2022-23 च्या अर्थसंकल्पात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व आभासी डिजिटल मालमत्ता किंवा क्रिप्टोवर 30 टक्के कर लावण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत, जर गुंतवणूकदाराला क्रिप्टोकरन्सी विकून फायदा झाला तर त्याला सरकारला कर भरावा लागणार आहे. यासह, जेव्हा कोणी क्रिप्टोकरन्सी विकतो तेव्हा त्याच्या विक्रीच्या एक टक्के दराने टीडीएसदेखील कापला जाईल.