बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. या अभिनेत्रीने क्रिकेटपटूचे नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधल्याने दोघांमधील सोशल मीडिया युद्ध सुरू झाले होते. मात्र, काही काळ हे प्रकरण शांत राहिले. उर्वशी रौतेला जेव्हा आशिया कप पाहण्यासाठी दुबईला पोहोचली तेव्हा या प्रकरणाने पुन्हा एकदा पेट घेतला. दरम्यान, उर्वशीने पंतची माफीही मागितली आहे. अशा परिस्थितीत आता उर्वशी आणि ऋषभ पंत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
टीम इंडियाने टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपली कंबर कसली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ सराव करत आहे. दरम्यान, अभिनेत्री उर्वशी रौतेलाही ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.