मनोरंजन

Urvashi Rautela: एक जखम अन् उर्वशी रौतेलाला तब्बल 1 लाख गुलाबांची भेट!

उर्वशी रौतेलाला 1 लाख गुलाबांची फुलं भेट देण्यात आलेली आहेत तिच असं म्हणनं आहे ही फुलं तिला तिच्या चाहत्याकडून मिळाली असावी. ज्यामुळे नेटकऱ्यांकडून ती आता ट्रोल होत आहे.

Published by : Team Lokshahi

उर्वशी रौतेला ही अनेक कारणांनी चर्चेत येत असते ज्यामुळे ती नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात. भारतीय क्रिकेटर रिषभ पंतवरून देखील ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. नेटकऱ्यांच्या मते तिच्या अतिअभिनयामुळे आणि नेहमी चर्चेत राहण्याच्या हेतूने ती काही तरी स्टंट करत असते. यावेळेस उर्वशी रौतेलाला 1 लाख गुलाबांची फुलं भेट देण्यात आलेली आहेत. तिच असं म्हणनं आहे, ही फुलं तिला तिच्या चाहत्याकडून मिळाली असावी. उर्वशी रौतेलाच्या बोटाला किरकोळ जखम झाली आहे, याच दुखापत दरम्यान तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

हे सगळ सुरु असताना तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडियो आणि काही फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये तिच्या अवती भवती गुलाबांच्या फुलांची आरास दिसत आहे. व्हिडियोमध्ये तिच्या बोटावरची जखम दाखवत, तिने कॅप्शन मध्ये "माझ्यासाठी प्रार्थना करा" असं लिहत चाहत्यांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तस काही न होता ती आता ट्रोल होत आहे. त्याचसोबत तिने लिहलं आहे, "माझ्या चाहत्यांकडून 1 लाख लग्झरी गुलाब" असं लिहलं आहे.

मात्र तिच्या या पोस्टवर नेटकरी ट्रोल करतं म्हणाले आहेत, ही अशी पैशाची उधळपट्टी आहे. खरं तर मला ती आवडते, पण राखी सावंत सारख्या तिच्या अति अभिनयामुळे मी तिचा तिरस्कार करू लागलो. पुढच्या वेळी आणखी चांगला प्रसिद्धी स्टंट करून पहा, लोकांनी तुला रंगेहाथ पकडले आहे. त्याचसोबत काही नेटकरी तिला म्हणाले, भारतातील पहिली अभिनेत्री पब्लिसिटीसाठी स्वत: 1 लाख गुलाब विकत घेते. सर्व पुष्पगुच्छांचे आवरण सारखे का असते? सगळे चाहते एकाच दुकानात जाऊन घेत होते का? बोटावर छोटा कट झाल्यानंतर एवढं नाटक करणारी ही अभिनेत्री पहिली भारतीय अभिनेत्री आहे. अशा प्रकारे सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाला ट्रोल केलं जात आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी