मनोरंजन

UPI युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! यामुळे होऊ शकतो तुमचं UPI खातं आणि UPI आयडी बंद

तुम्हीही यूपीआय पेमेंट वापरता का तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. UPI युजर्ससाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Published by : shweta walge

तुम्हीही यूपीआय पेमेंट वापरता का तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. UPI युजर्ससाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये सरकारने म्हटलं आहे की, युजर्सच्या निष्काळजीपणामुळे तुमचं UPI खातं आणि UPI आयडी बंद होऊ शकतो.

UPI नेटवर्क चालवणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने, गुगत पे, पेटीएम आणि फोन पे सारख्या थर्ड पार्टी यूपीआय अ‍ॅप्सना काही यूपीआय आयडी आणि नंबर ब्लॉक करण्यास सांगितलं आहे.

यूपीआय युजर्ससाठी महत्त्वाची बातमी

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या नोटिसनुसार, वर्षभरात एकापेक्षा जास्त वेळ कोणताही व्यवहार न झालेली खाती बंद करण्यात येणार आहेत. NPCI ने UPI नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, वापरात असलेला यूपीआय क्रमांक आणि यूपीआय आयडी सक्रिय राहतील.

NPCIने निष्क्रिय UPI क्रमांक आणि आयडी बंद करण्यासाठी बँका आणि थर्ड पार्टी अ‍ॅप्सना 31 डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे, जर युजर्सला त्याचा UPI आयडी आणि नंबर नेटवर्क बंद करायचं नसेल, तर त्याला त्याचा UPI सक्रिय ठेवावा लागेल. UPI आयडी आणि नंबर नेटवर्क काढताना किंवा बंद करताना, बँका आणि थर्ड पार्टी अ‍ॅप्सना ईमेल आणि मेसेजद्वारे युजर्सना माहिती द्यावी लागेल.

एनपीसीआयने सांगितलं आहे की, 'डिजिटल पेमेंट क्षेत्रामध्ये ग्राहकांसाठी सुरक्षित व्यवहाराचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी बँकिंग प्रणाली नियमितपणे तपासणे आवश्यक आहे. काही युजर्स नव्याने अकाऊंट लिंक करुन मोबाइल नंबरला बदलतो पण त्या नंबरवरून यूपीआई खाते बंद करत नाही.'

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी