Institute Of Pavtology Team Lokshahi
मनोरंजन

"बहुचर्चित "इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी" चित्रपटाचा टीजर लाँच"

धमाल उडवून देणारा "इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी"

Published by : Siddhi Naringrekar

"इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी" (Institute of Pavology) या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. अत्यंत धमाकेदार असा चित्रपट (movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियात (social media) लाँच करण्यात आला. त्यामुळे इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी(Institute of Pavology) म्हणजे काय याचं कोडं आता लवकरच सुटणार आहे.

फटमार फिल्म्स प्रस्तुत इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीची (Institute of Pavology) निर्मिती ब्लिंक मोशन पिक्चर्सच्या सागर छाया वंजारी आणि अभिषिक्ता एन्फोटेन्मेंटच्या प्रसाद नामजोशी यांनी केली आहे. तर विजय नारायण गवंडे, श्रीकांत देसाई सहनिर्माते आहेत. पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर हा चित्रपट बेतला आहे. प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाचं पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी दिग्दर्शन केलं आहे. या दोन्ही दिग्दर्शकांचे या पूर्वीचे चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवले गेले असल्यानं इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टीत चर्चा आहे.

चित्रपटात सयाजी शिंदे (sayaji shinde) आणि गिरीश कुलकर्णी (girish kulkarni ) पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यांच्यासह दिलीप प्रभावळकर, शशांक शेंडे, दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, सुयश झुंजुरके, विजय निकम, शिवराज वाळवेकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. सागर वंजारी यांनी संकलन, विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिग्दर्शन, गिरीश जांभळीकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Pune International Film Festival )नुकताच हा चित्रपट दाखवला गेला. महोत्सवात चित्रपटाला भरभरून दाद मिळाली. आता हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाच्या टीजरवरूनच हा चित्रपट अतिशय युथफूल, संगीतमय, कलरफुल आणि धमाल असेल असा अंदाज बांधता येतो. त्यामुळेच आता चित्रपटाविषयीचं कुतुहल आणखी वाढलं आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी