admin
मनोरंजन

भाजप नेत्याकडून अक्षय कुमारच्या अटकेची मागणी, काय आहे प्रकरण?

अभिनेता अक्षय कुमारवर (Actor Akshay Kumar) देशातील सर्वाधिक आयकर भरणारा कलाकार आहे. सैनिकांसाठी नेहमी मोठी मदत तो करत असतो. अनेक सामाजिक उपक्रमात त्याचा सहभाग असतो.

Published by : Team Lokshahi

अभिनेता अक्षय कुमारवर (Actor Akshay Kumar) देशातील सर्वाधिक आयकर भरणारा कलाकार आहे. सैनिकांसाठी नेहमी मोठी मदत तो करत असतो. अनेक सामाजिक उपक्रमात त्याचा सहभाग असतो. मात्र आता भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी अक्षय कुमारच्या अटकेची मागणी केली आहे.

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आगामी चित्रपट 'राम सेतू'(Ram setu) 11 ऑगस्ट रोजी चित्रपट गृहात येत आहे. या चित्रपटात अनेक चुकीचे दृश्य असल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. तसेच अक्षय कुमार विरोधात आपण कोर्टात याचिका दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असे टि्वट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

काय आहे प्रकरण

अभिषेक शर्मा दिग्दर्शित केलेला 'राम सेतू' (Ram Setu)चित्रपटात अक्षय कुमार सोबत जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आहे. या चित्रपटावर स्वामी यांनी नाराजी व्यक्त करत अक्षय कुमार विरुद्ध याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलं आहे की,'अक्षयच्या राम सेतू सिनेमात काही घटना, मुद्दे हे चुकीचे दाखवले गेले आहेत. मूळ घटनेचा विषय भरकटवले आहे. यामुळे वकील सत्या सभ्रवाल माझ्यामार्फत खटला लढवणार आहेत. मी अभिनेता अक्षय कुमार आणि कर्मा मीडियावर ही केस दाखल करत आहे.'

सुब्रमण्यम स्वामी यांनी आणखी एक ट्वीट करत लिहिलं आहे-जर अक्षय कुमार एक परदेशी नागरिक आहे तर त्याला आपण अटक करण्याची मागणी नक्कीच करू शकतो. ज्या देशाचं नागरिकत्व त्याच्याकडे आहे त्या देशाला आपण त्याला अटक करण्याची, त्याचं नागरिकत्व रद्द करण्याची मागणी देखील करू शकतो.

दरम्यान या सिनेमामध्ये जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरुचा, सत्यदेव हे कलाकार आहेत. हे देखील या सिनेमाच्या पोस्टरमध्ये दिसत आहेत. राम सेतू सिनेमा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर तो अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज केला जाणार आहे. हा सिनेमा डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिग्दर्शित केला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी