Jayeshbhai Jordaar Team Lokshahi
मनोरंजन

रणवीरच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी अडचणीत वाढ

जयेशभाई जोरदार चित्रपटामधील ट्रेलरमध्येही एक दृश्य दाखवण्यात आलं आहे. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयात या दृश्यावर आक्षेप घेत याचिका दाखल केली

Published by : shamal ghanekar

अभिनेता रणबीर सिंहचा (Ranveer Singh) अगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार' (Jayeshbhai Jordaar) याचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. या चित्रपटाची प्रचंड चर्चा होत आहे. पण मात्र प्रदर्शनाआधीच या चित्रपटावर कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. पण या चित्रपटामधील एक दृश्य असे आहे की त्याच्यावर आक्षेप घेतला गेला आहे. दिल्लीतील (Delhi) उच्च न्यायालयाने या दृश्यावर याचिका दाखल करण्यात आली आहे.

रणवीर सिंहच्या ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटामध्ये भ्रूणाचं लिंग परीक्षण करत असल्याचं एक दृश्य दाखवण्यात आले आहे. तसेच ट्रेलरमध्येही दृश्य दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात या दृश्यावर आक्षेप घेत याचिका दाखल केली. ‘बाळाच्या जन्मआधी लिंग परीक्षण करणं हे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले हे दृश्य लोकांना अशाप्रकारचा गुन्हा करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकते. त्यामुळे या चित्रपटातील हे दृश्य काढून टाकावे.’ असे या याचिकेत म्हटले आहे.

या चित्रपटामध्ये कॉमेडी (comedy ) ड्रामा असणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह एका गुजराती (Gujarati) व्यक्तीची भूमिका साकारताना दिसणार आहे. आणि तो आपल्या जन्माला येणाऱ्या मुलीसाठी लढताना दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि अभिनेत्री शालिनी पांडे (Shalini Pandey) हे महत्त्वाची भूमिका निभवताना दिसणार आहे. या दोघांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात बोमन ईरानी आणि रत्ना पाठक यांचीही या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. जयेशभाई जोरदार चित्रपटाचे दिग्दर्शन दिव्यांग टक्कर यांनी केलं आहे. यशराज बॅनरची निर्मिती असलेला हा चित्रपट १३ मे ला प्रदर्शित होणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे