मनोरंजन

पल्लवी जोशी 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर; रंगणार गप्पांची मैफील

जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'.

Published by : Siddhi Naringrekar

जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात अभिनेत्री पल्लवी जोशी हॉट सीटवर येणार आहे. ‘कोण होणार करोडपती’मध्ये ती 'श्रीमती पिरोजा माणिकजी मूस आर्ट गॅलरी अँड कल्चरल सेंटर ट्रस्ट' या संस्थेसाठी खेळणार आहे. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात पल्लवी जोशीबरोबर गप्पा रंगणार आहेत. प्रेक्षकांची ही आवडती अभिनेत्री 'कोण होणार करोडपती'मध्ये येणार आहे मालिका, नाटक आणि चित्रपट अशा विविध मंचांवरून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ही गुणी अभिनेत्री. पल्लवीने तिच्या सुरेल आवाजात या विशेष भागाची सुरुवात केली. या विशेष भागात पल्लवी जोशीने तिच्या बालपणातल्या आठवणी सांगितल्या. तिच्या पदार्पणाचा किस्सा त्यांनी सांगितला. पहिल्या चित्रपटादरम्यान झालेली फॅन मोमेन्ट तिने आज 'कोण होणार करोडपाती'च्या मंचावर सांगितली.

आपल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात जागा असणारी अभिनेत्री पल्लवी जोशी आता 'कोण होणार करोडपाती'च्या मंचावर येते आहे. या वेळी सचिन खेडेकरांबरोबर तिच्या कमाल गप्पा रंगल्या. पल्लवीच्या सुरेल आवाजात या विशेष भागाची सुरुवात झाली. पल्लवीने नासीर हुसेन यांच्याबरोबर काम करतानाच अनुभव सांगितला. त्यांनी अभिनय डोळ्यातून कसा करावा याबद्दल पल्लवीला सांगितले. एकत्र काम करत असताना त्यांनी फक्त डोळ्यातून अभिनय कसा करावा हे समजावले. पल्लवी नक्कीच त्या गोष्टी आपल्या अभिनयात वापरात आणत असेलच. आता 'श्रीमती पिरोजा माणिकजी मूस आर्ट गॅलरी अँड कल्चरल सेंटर ट्रस्ट' या संस्थेसाठी खेळताना ती किती रक्कम जिंकते हे पाहण्याजोगे असेल.

नाटक, सिनेमा, मालिका असा ऑल राउंड परफॉर्मन्स करणारी अभिनेत्री पल्लवी जोशी हिचा सहभाग असलेला 'कोण होणार करोडपती'चा हा विशेष भाग ५ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल. जिंकलेली रक्कम ती 'श्रीमती पिरोजा माणिकजी मुस आर्ट गॅलरी अँड कल्चरल सेंटर ट्रस्ट' या संस्थेला देणार आहे. आता 'श्रीमती पिरोजा माणिकजी मुस आर्ट गॅलरी अँड कल्चरल सेंटर ट्रस्ट'साठी खेळताना 'कोण होणार करोडपाती'च्या खेळात ती किती रक्कत जिंकते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पाहायला विसरू नका,'कोण होणार करोडपती' विशेष भाग, ५ ऑगस्ट, शनिवारी रात्री ९ वाजता, फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव; भाजपचे राजेश वानखडे यांचा विजय

महाविकास आघाडीला मोठा झटका, दिग्गजांचा पराभव

Amit Thackeray : माहिम मतदारसंघातून अमित ठाकरे यांचा पराभव; पोस्ट शेअर करत म्हणाले...

Tivsa Vidhansabha, Amravati : तिवसामधून यशोमती ठाकूर यांचा दारूण पराभव ; कॉंग्रेसला मोठा धक्का

Amol Khatal win Sangamer Assembly Election Result 2024: बाळासाहेब थोरातांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का; अमोल खताळ विजयी