Thech Team Lokshahi
मनोरंजन

"ठेच"मधून उलगडणार प्रेमत्रिकोण !

"ठेच" चित्रपट १५ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला

Published by : shweta walge

लक्ष्मण सोपान थिटे (Laxman Sopan Thitte) दिग्दर्शित 'ठेच' Thech या चित्रपटातून प्रेमत्रिकोणाची कथा पाहता येणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं असून १५ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

श्री नृसिंह फिल्म प्रॉडक्शन (Sri Nrusinha Film Production) प्रस्तुत "ठेच" या चित्रपटाची निर्मिती शिवाजी बोचरे, ज्ञानदेव काळे, सईद मोईन सईद नूर, कैलास थिटे, श्रीराम वांढेकर, गजानन टाके यांनी केली आहे. लक्ष्मण सोपान थिटे यांनी चित्रपटाचं कथालेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. किरण कोठेकर, हेमंत शेंडे यांनी छायांकन, फैसल आणि इमरान महाडिक यांनी संकलन, तन्मय भावे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. आई वडील नसलेला, शिवा मामाच्या घरी राहून आपलं दहावीचं शिक्षण पूर्ण करून कॉलेजला जातो. तिथे त्याची मैत्री शामबालाशी होते. शामबालाची मैत्रीण पल्लवी ही शिवाला खूप आवडते. तो मनोमनी तिच्या सोबत आयुष्याची स्वप्न रंगवत असतो. पण शामबाला शिवाच्या प्रेमात पडते. शामबाला शिवाला प्रपोज करण्याअगोदर शिवा शामबाला जवळ पल्लावीला प्रपोज करतो. पण हट्टी शामबाला शिवाला कसं मिळवायचं हे प्लॅन करत असते. पण शिवाने पल्लवीला मिळवण्यासाठी आणि तिच्या स्वप्नासाठी केलेला रोमांचक प्रवास ठेच या चित्रपटातून मांडला आहे.

प्रेमाचा त्रिकोण (love triangle) ही संकल्पना अजरामर आहे. ठेच या चित्रपटात प्रेमत्रिकोण ही संकल्पना नव्या दमाच्या कलाकारांसह नव्या पद्धतीनं हाताळण्यात आली आहे. त्यामुळे "ठेच" नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवेल यात शंका नाही.

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी

Eknath Shinde Will be next CM? एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद?

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे