Ed action on Raj Kundra  team lokshahi
मनोरंजन

Ed action on Raj Kundra : राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल

गुन्हे शाखेने फेब्रुवारी २०२१ मध्ये पॉर्न फिल्मचे चित्रीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास करण्यास सुरुवात केली होती

Published by : Shweta Chavan-Zagade

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Actress Shilpa Shetty Husband Raj Kundra) पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. अश्लील व्हिडिओ प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने (ED) राज कुंद्रा ( Ed action on Raj Kundra ) यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात २०२१ मध्येच गुन्हा दाखल केला होता.

गुन्हे शाखेने फेब्रुवारी २०२१ मध्ये पॉर्न फिल्मचे चित्रीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास करण्यास सुरुवात केली होती. या तपासामध्ये राज कुंद्राचे नाव सातत्याने पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला. या तपासात राज कुंद्रा हाच 'मास्टरमाइंड' असल्याचं समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

काय आहे नेमके प्रकरण -

राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी असून तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायअप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या भावोजींच्या मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक अ‍ॅप होते. या कंपनीच्या सर्व कंटेंटची निर्मिती, या अ‍ॅपचे ऑपरेशन्स, अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या व्हिआन या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुप, ई-मेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या होत्या.

राज कुंद्राने काय म्हटलं होतं?

'माझ्या प्रॉडक्शन हाऊसने बनवलेले व्हिडिओ कामुक असू शकतात, परंतु त्यात कोणतीही शारीरिक किंवा लैंगिक क्रिया दाखवण्यात आलेली नाही. पॉर्न प्रकरणात ते व्हिडिओ मोडत नाहीत. तपास यंत्रणांनी कामुक आणि प्रौढ व्हिडिओ यांमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे,' असं म्हणत राज कुंद्राने आपली बाजू मांडली होती

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी