भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून जिला ओळखलं जात अशा दीपिका पादुकोणने अनेक मनांवर राज्य केले आहे. "ओम शांती ओम" या चित्रपटातून दीपिकाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर तिने अनेक चित्रपट केले बॉलिवूडसोबतच तिने हॉलीवूडमध्ये देखील आपली उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. "चांदनी चौक टू चायना", "पद्मावत", "चेन्नई एक्सप्रेस", "ये जवानी है दीवानी", "बाजीराव मस्तानी" हे दीपिकाचे बॉलिवूडमधले काही गाजलेले चित्रपट आहेत. त्याचसोबत तिने "ट्रिपल एक्स" या चित्रपटाद्वारे हॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि तसेच "ऐश्वर्या" हा तिचा दक्षिणात्य चित्रपट आहे.आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने जगभरातल्या चाहत्यांना दीपिकाने भुरळ घातली आहे. तिच्या आगामी चित्रपटांमुळे आणि तिच्या प्रेग्नंसीमुळे दीपिका हल्ली चर्चेत येताना दिसते.
यावेळी दीपिका पादुकोण एका वेगळ्या कारणाने चर्चेत येताना दिसत आहे तिने भारतीय चित्रपटसृष्टीत नवा विक्रम रचल्याचं समोर आलं आहे. दीपिका पादुकोण आता 10,000 कोटींच्या वर्ल्ड वाइड क्लबमध्ये एन्ट्री करणार असल्याचं समोर आलं आहे. दीपिकाचे नुकतेच काही चित्रपट आले आणि ते मोठ्या प्रमाणात कमाई देखील करताना दिसून येत होते. आता पुन्हा दीपिका "सिंघम अगेन" या चित्रपटाद्वारे चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. दीपिका पदुकोणचा "सिंघम अगेन" हा चित्रपट तिच्या आजवरच्या कारकिर्दीतील 30 वा चित्रपट असेल आणि तिच्या 29 चित्रपटांमधून जगभरात एकूण 9808 कोटी रुपयांची कमाई दीपिका पादुकोणने केली आहे. त्यामुळे ती हा असा रेकॉर्ड रचण्यासाठी सज्ज आहे.