टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Banerjee) आई झाली आहे. नुकतेच देबिनाने एका मुलीला जन्म दिला आहे. एक्टर गुरमीत चौधरीने (Gurmeet Chaudhary) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर (Video sharing) करत लिहीले की आमच्या सर्व ग्रैटिट्यूड (Gratitude), आम्ही आमच्या बाळाचे या जगात स्वागत करतो. 3-4-2022, तुमच्या सर्व प्रेम आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद. या व्हिडिओमध्ये गुरमीत आणि देबिनाचा हात त्यांच्या मुलीच्या हातासह दिसत आहे.
देबिना आणि गुरमीत लग्नाच्या 11 वर्षानंतर पालक झाले आहेत. दोघांनी 9 फेब्रुवरी 2022 ला ते आई बाबा होणाऱ्याची बातमी कळवली होती. आता दोघही मुलीच्या जन्माने खुप आंनदी झाले आहेत. सोशल मीडियावर दोघांचेही चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत.