थोडक्यात
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
याप्रकरणी महाराष्ट्रातील वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. यातच आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी महाराष्ट्रातील वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
शाहरुखला धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कॉल ट्रेस केला तेव्हा तो रायपूरचा असल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर पोलिसांचे पथक रायपूरला गेले. मिळालेल्या माहितीनुसार फैजान नावाच्या एका व्यक्तीने रायपूरहून शाहरूख खानला धमकीचा फोन केला.
मुंबई पोलीस या प्रकरणाची गंभीर दखल घेत आहेत. शाहरुख खानला ही धमकी देण्यामागचा हेतू शोधला जात आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक रायपूरला पोहोचले आहे. तेथे हे पथक या प्रकरणाची चौकशी करेल. वांद्रे पोलीस ठाण्यात शाहरुख खानला धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने म्हटले की, शाहरुख खानला जीव वाचवायचा असेल तर आम्हाला करोडो रुपये द्या. अन्यथा त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल आणि त्यानंतर कॉल डिस्कनेक्ट झाला. फोन करणाऱ्या आरोपीचे नाव फैजान खान असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने फोन बंद केला आहे. त्याचे ठिकाण जाणून घेण्याचा प्रयत्न केला.