ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालाय. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विटरवरु ही माहिती दिली. '5 दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत, वहिदा जींनी आपल्या भूमिका अत्यंत चोखंदळपणे साकारल्या, त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, आणि आता भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणारंय, हे जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे. असं ट्विट ठाकूर यांनी केलंय.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, वहिदा रेहमान जी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे हे जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे.
हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी समीक्षकांनी वहिदा यांची प्रशंसा केली आहे. त्यापैकी प्यासा, कागज के फूल, चौधवी का चाँद, साहेब बीवी और गुलाम, मार्गदर्शक, खामोशी अशा प्रमुख चित्रपटांचा सामावेश आहे.