Aryan Khan team lokshahi
मनोरंजन

Aryan Khan : कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला NCB कडून क्लीनचीट

Published by : Shweta Chavan-Zagade

कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज ( Drugs on Cordelia Cruise) पार्टीप्रकरणात आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेला आर्यन खान (Aryan Khan) याला अमली पदार्थ नियंत्रण कक्ष अर्थात एनसीबीकडून क्लीनचीट देण्यात आली आहे. एनसीबीकडून (NCB) शुक्रवारी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये एनसीबीकडून आर्यनला (Aryan Khan) क्लीनचीट देण्यात आली.

आर्यन खानला कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज नव्हते, असे एनसीबीने म्हटले आहे. या आरोपपत्रात एनसीबीने एनडीपीएस कायद्यातंर्गत एकूण 14 जणांवर ड्रग्ज सेवनाचा ठपका ठेवला होता. तर उर्वरित सहा जणांवरील आरोप पुराव्यांअभावी मागे घेण्यात आले आहेत. एनसीबीने (ncb) कॉर्डिलिया क्रुझवर धाड टाकली तेव्हा आर्यन खान, मोहक यांना वगळून आरोपी असणाऱ्या सर्व व्यक्तींकडे ड्रग्ज सापडले होते, अशी माहिती एनसीबीचे अधिकारी संजय कुमार (sanjay kumar) यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कोर्डिलिया क्रूझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी