Apple ने अलीकडेच मुंबईतील Jio World Drive Mall मध्ये आपले पहिले स्टोअर घोषित केले आहे, जे आज 18 एप्रिलपासून सुरू होणार आहे. मुंबईनंतर आता अॅपलने देशाची राजधानी नवी दिल्लीत आपले स्टोअर सुरू करण्याची घोषणा केली आहे. Apple ने म्हटले आहे की Apple Store 20 एप्रिल रोजी दिल्ली येथे सुरू होणार आहे. या दोन्ही अॅपल स्टोअरमध्ये अॅपलची सर्व प्रकारची उत्पादने पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळेल.
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये भारतातील पहिले Apple रिटेल स्टोअर सुरु होणार आहे. हे अॅपल स्टोअर 20 हजार 806 चौरस फुटांचं आहे, ज्याचे भाडे 42 लाख रुपये प्रति महिना आहे. अॅपल स्टोअरच्या लॉन्चिंगसाठी अॅपलचे सीईओ टिम कुक सोमवारी भारतात आले आहेत. भारतात आल्यानंतर त्यांनी देशातील श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांची भेट घेतली.
तसेच Apple CEO Tim Cook यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत मुंबईच्या वडापावचा आस्वाद घेतला. अॅपलचे सीईओ टीम कुक हे सध्या भारतात आपल्या अॅपल स्टोअरच्या उद्घाटनासाठी आले आहेत. सध्या टीम कुक आणि अभिनेत्री माधुरी दीक्षितचा वडापाव खातानाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. माधुरी दीक्षितने स्वत: या भेटीचा फोटो ट्विटरवर शेअर केलाय