मनोरंजन

आज भाईजानचा बर्थडे; सलमान खानबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?

बॉलिवूडचा सुपरस्टार आणि 'दबंग' अभिनेता सलमान खान आज त्याचा ५७वा वाढदिवस साजरा करत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

बॉलिवूडचा सुपरस्टार आणि 'दबंग' अभिनेता सलमान खान आज त्याचा ५७वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात झाला. त्याचे वडील बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक सलीम खान आहेत. सलमान खानला अरबाज आणि सोहेल खान हे दोन भाऊ, तर, अलविरा आणि अर्पिता या दोन बहिणीही आहेत.

'मैने प्यार किया', 'सनम बेवफा', 'साजन', 'हम आपके है कौन', 'करण अर्जुन', 'दबंग 2', 'किक', 'बजरंगी भाईजान', 'सुलतान', 'रेस', ‘राधे’ 'जुडवा', 'प्यार किया तो डरना क्या', 'बीवी नंबर वन', 'हम दिल दे चुके सनम', 'नो एंट्री', 'पार्टनर', 'वॉन्टेड', 'दबंग', 'रेडी', 'बॉडीगार्ड', 'एक था टायगर', 'टायगर जिंदा' है’ अशा जबरदस्त चित्रपटांमध्ये सलमान खान झळकला. 'बीवी हो तो ऐसी' हा सलमान खानचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्याने सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली होती. इतकाच नाही तर, या चित्रपटासाठी त्याला अवघं ७५ रुपये मानधन मिळालं होतं. 'मैंने प्यार किया'मध्ये हा चित्रपट चांगलाच गाजला. सलमानचा हा चित्रपट त्या काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. यासाठी सलमान खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

या खास निमित्ताने काल (२६ डिसेंबर) सलमान खानच्या घरी जंगी प्री-बर्थडे पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.यावेळी सगळेच सेलिब्रिटी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून आले होते. तर, स्वतः सलमान खान देखील आपल्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यासह आला आणि त्याने केक कापला. सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘बॉलिवूड किंग’ शाहरुख खान देखील या पार्टीत सामील झाला होता.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी