कोरोनाचे नियम शिथील झाल्यानंतर दिवळीमध्ये सरकारने चित्रपटगृह सुरू करण्याचे आवाहन केले. चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर सर्वात आधी अक्षय कुमारचा सिनेमा प्रदर्शित झाला तो म्हणजे "सूर्यवंशी" हा सिनेमा सुपरहिट झाला.
हा सिनेमा 1993 मध्ये झालेल्या बॉम्ब हल्यावर तसेच २००२ बस ब्लास्ट आणि २००६ ट्रेन ब्लास्ट व त्यानंतर २००८ मध्ये ताज हॉटेलवर झालेला हल्ला आणि मुंबई वरती सर्वात मोठा ब्लास्ट होण बाकी होत आणि याला कश्याप्रकारे थांबवता येईल यावर आधारित हा सिनेमा होता. प्रेक्षकांनी सुपरहिट सिनेमा सूर्यवंशीला चांगलाच प्रतिसाद दिला
सूर्यवंशीच्या यशानंतर अक्षय कुमारने त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवर आता "अतरंगी रे" या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित केलं आहे. या सिनेमाचे ट्रेलर २५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच देखील अक्षय कुमार याने सांगितल आहे. तर हा सिनेमा 24 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अक्षय कुमार अतरंगी रे या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करता म्हणाला कि " प्रेमकथेपेक्षा जादुई काहीही नाही. याचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा." तसेच हा सिनेमा डिझनी हॉटस्टार वर प्रदर्शित होणार असल्याच देखील म्हणाला.
यानंतर अक्षय कुमारने त्याचा पुढील "पृथ्वीराज" या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित केलं आणि या चित्रपटामध्ये अक्षय कुमार हा पृथ्वीराज चौहान या राजाची भूमिका साकारणार असल्याच दिसून आलं. हा सिनेमा नवीन वर्षाच्या म्हणजेच 21 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार असल्याच अक्षय कुमार याने सांगितल आहे.
ऑक्टोंबर 18 मध्ये प्रदर्शित झालेला "गोरखा" हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेता अक्षय कुमारच्या येणाऱ्या नवनवीन सिनेमांवर प्रेक्षक उत्सुक असल्याच दुसून आलं आहे.