मुंबई | मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे विभागात रिलायन्स जियोचं नेटवर्क बंद पडलं आहे. जिओ ग्राहकांना दुपारच्या 12.15 वाजल्यापासून नेटवर्क नाही. नेटवर्क बंद असल्यामुळे जिओ ग्राहकांची तारांबळ उडाली आहे. याबाबत ग्राहकांच्या तक्रारी येत आहे. जिओच्या नेटवर्क मध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे विभागात जिओचं नेटवर्क बंद केले आहे.
याबाबत कर्मचारी तांत्रिक अडचणी दुर करण्याचा प्रयत्न करत आहे. जिओचं नेटवर्क ठप्प झाल्यामुळे कॉलिंग आणि इंटरनेट बंद झाले आहे. त्यामुळे ग्राहकांची तक्रार वाढली आहे. लवकरच याबाबत उपाय केले जातील, अशी माहिती सुत्राकडून दिली जात आहे.