दिशा सालियन ( disha salian) बदनामी प्रकरणी नारायण राणे, (narayan rane ) नितेश राणेंविरोधात (nitesh rane ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप नेते नितेश राणे यांनी दिशा सालियनप्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
दिशा सालियनची हत्या झाल्याची सांगत तिच्यावर अत्याचार झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे आपल्या मुलीची बदनामी थांबवावी म्हणून सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून मदतीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला होता. पोलिसांनी हा अहवाल दिला आहे.
काही दिवसांपूर्वी नारायण राणेंनी एक ट्विट केलं होत की, 'खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी, लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले "बॉस " आणि आपण कुठे धावणार?', असे राणेंनी ट्विट केलं होतं.