देशात कोरोना पसरवण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील 'आप' करत आहेत. यांनी गलिच्छ राजकारण देखिल केले आहे. अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली आहे. या पक्षांनी राज्यांतून आलेल्या लोकांना त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यामुळे कोरोनाचा हाहाकार झाला. याशिवाय त्यांनी काँग्रेसवर चांगलेच टीकास्त्र सोडलं होतं.
महाराष्ट्रातील महाविकासआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादीने तर 'झुकझुक झुकझुक आगीन गाडीचं' नव व्हर्जन आणत मोदींना चांगलेच टोले लगावले आहेत.
श्रमिक ट्रेन सोडल्या म्हणून आधी त्याचे श्रेय घेतले. आता त्याच श्रमिक ट्रेनमधून गेलेल्या मजुरांद्वारे कोरोना पसरला असे दावे केले. चुनावजीवींचा पॅटर्नच वेगळा." असे राष्ट्रवादी कॉंग्रेसने ट्वीट करत म्हटले आहे. यासोबत "झुकझुक झुकझुक श्रमिक गाडी, प्रचाराच्या रेषा संसदेत काढी, थापांची पुडी सोडूया, सत्तेच्या गावाला जाऊया" असं लिहिलं आहे. महाराष्ट्रद्वेषी असा हॅशटॅग देखील वापरला आहे.