India

‘महिलांना इच्छेनुसार कपडे घालण्याचा अधिकार संविधानाने दिला’ | Priyanka Gandhi

Published by : Lokshahi News
कर्नाटकमध्ये सध्या हिजाब प्रकरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबविरोधातील निदर्शने काढण्यात आली असून त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटलेले पाहायला मिळत आहेत.शाळांसह सर्व शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. उडुपी जिल्ह्यातील मणिपाल येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये भगवी शाल आणि हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींच्या दोन गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्याने तणाव वाढला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, मुलांचा एक गट हिजाब परिधान केलेल्या मुलींसोबत गैरवर्तन करताना दिसत होता. या व्हिडिओमध्ये  मुस्कान नावाची तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये आली असता एक जमाव तिच्या दिशेने चालत येतो. यानंतर तो जमाव तरुणीसमोर 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यास सुरुवात करतात. यानंतर तरुणीदेखील त्यांना उत्तर देत 'अल्लाहू अकबर' ची घोषणा देते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.या प्रकरणावर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.प्रियंका गांधी म्हणाल्या की, बिकिनी असो, जीन्स असो, हिजाब असो किंवा डोक्यावर पदर घेणे असो, महिलांना त्यांच्या इच्छेनुसार कपडे घालण्याचा अधिकार आहे. हा अधिकार त्यांना संविधानाने दिला आहे. त्यांच्यावरील अत्याचार थांबवा.' 'लडकी हूं, लड सकती हूं' असा हॅशटॅगही दिला आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे