सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही. रमना हे देशाचे पुढचे सरन्यायाधीश असणार आहेत. एन.व्ही. रमना यांच्या नावाला मंगळवारी सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली. राष्ट्रपतींच्या मंजुरीचे पत्रही सर्वोच्च न्यायालयात पाठविण्यात आले आहे.
विद्यमान सरन्यायाधीश एस.ए. बोबडे हे २३ एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत असल्याने येत्या २४ एप्रिल रोजी मुख्य न्यायाधीश एन.व्ही. रमना हे देशाच्या ४८ व्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती भवनात मुख्य न्यायाधीश एन.व्ही. रमना यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देणार आहेत.