पाच राज्यांतील निवडणूक (assembly election result)निकाल आज जाहीर होत आहे. यानंतर गेल्या काही दिवसांपासून रोखून धरलेली पेट्रोल-डिझेलची दरवाढीला सुरुवात होणार आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ होऊनही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी आजही इंधनाच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत.
भारतीय पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) नुसार, आज मुंबईत एक लिटर पेट्रोल दर 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपयांना विकलं जात आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लीटर आहे. याशिवाय, कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 104.67 रुपयांवर आणि डिझेलचे दर 89.79 रुपयांवर स्थिर आहेत. चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
मुंबईतील दर
पेट्रोल – 109.98 रुपये प्रति लिटर
डिझेल – 94.14 रुपये प्रति लिटर