Vidharbha

देवदर्शनाला जाताना कारचा अपघात; तीन भाविकांचा मृत्यू

Published by : Shweta Chavan-Zagade

भूपेश बारंगे | महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivaratri 2022) पचमडी येथे देवदर्शनाला जाताना कारचा अपघात घडला. यात वर्ध्यातील (wardha) दोघे तर अमरावती मधील एकाचा अपघातात मृत्यू झाला तर एक जण बचावला. ही घटना आज पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेने गावात शोककळा पसरली. तुषार झामडे यांची कार क्र. महा 02 बिजी 3204 च्या कारने भिंतीला धडक दिल्याने अपघातात समोरील भागाचा चेंदामेंदा झाला आहे.

वर्ध्यातील आष्टी येथून काल सायंकाळी 4 मित्र मध्यप्रदेशातील पचमडी येथे भोलेनाथांच्या देवदर्शनाला निघाले. पचमडी येथे महाशिवरात्री (Mahashivaratri 2022) निमित्त मोठी यात्रा भरली जाते यासाठी विदर्भातील मोठ्या प्रमाणात भाविक दर्शना जात असतात. नागपूर, अमरावती ,वर्धा यासह इतर जिल्ह्यातील भाविक जातात.यातच काल अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील अक्षय गौरखेडे आणि वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तुषार ज्ञानेश्वर झामडे व दीपक भाऊराव डाखोरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण बचावला असून त्यांचे नाव अद्यापपर्यंत कळू शकले नाही.
मध्यप्रदेश मधील पचमडी येथे जाताना मोरका गावाजवळ रस्त्याच्या वळणावर चालकाचे वाहनवरून नियंत्रण सुटल्याने वळनावरील भिंतीला जबर धडक दिली.या धडकेत कारने चार पलटी घेतली. अपघात इतका भीषण होता की कारमधील तीन जण जागीच ठार झाले. या घटनेने आष्टी व तीवस्यात शोककळा पसरली .

भाजपच्या युवा मोर्च्यांच्या जिल्हा उपाध्यक्ष तर आत्येभाऊ मामेभावाचा मृत्यू

मध्यप्रदेश मधील पचमडी येथे जाताना कारच्या अपघात घडला यात आष्टी तालुक्यातील भाजपच्या युवा मोर्च्यांच्या जिल्हा उपाध्यक्ष तर आत्ये भाऊ व मामेभावाचा मृत्यू झाला आहे.तुषार आणि अक्षय हे दोघे नातेवाईक आहे तर दीपक डाखोरे हे भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष होते.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी