भूपेश बारंगे, वर्धा | वर्ध्यातील (Wardha News) मसाळा शिवारात विहिरीत पुरुष व महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज दुपारी उघडकीस आली होती.दोघेही वेगवेगळ्या गावचे रहिवाशी असून दोघांच्या आत्महत्यांचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे.
मृतक मंगला राजेंद्र उपाटे वय 40 रा.जुना मसाळा व महेश कमलाकर बारई वय 40 वर्ष रा.वरुड यांनी मृतक महिलेच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. मृतक दोघेही सोबतच बचत गटाचे काम करत होते.दिवसभर सोबतच असायचे असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
अशातच मंगला उमाटे ही घरुन बेपत्ता होती. याबाबत सेवाग्राम पोलिसात (Sewagram Police) तक्रार देण्यात आली होती. बेपत्ता महिलेचा शोध घेताना आज दुपारच्या सुमारास तिच्या शेतातील विहिरीत दोघांचे मृतदेह पाण्यात तरंगताना दिसल्याने घटना उघडकीस आली.घटनास्थळी काही अंतरावर मृतक महेश यांची दुचाकी आढळून आली. याबाबत सेवाग्राम पोलिसांना माहिती देण्यात आली असून घटनास्थळी सेवाग्राम पोलिसांनी पंचनामा करण्यात आला घटनेची नोंद करण्यात आली आहे. विहिरीतून दोघांचाही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे ,प्रकाश निर्मल, दीपक ठाकूर, सचीन सोनटक्के, प्रशांत क्षीरसागर ,विलास लोहकरे यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी करण्यात आली.
दोघांच्याही आत्महत्येचे कारण अस्पष्ट
मसाळा आणि वरुड या गावातील दोघेही रहीवाशी असून सोबतच बचत गटात काम करणाऱ्या महिला व पुरुषाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्यात आली. महिला घरुन निघून गेली होती.त्यामुळे दोघांच्याही आत्महत्येचे तर्कवितर्क काढले जात असून अद्यापही कारण मात्र अस्पष्ट आहे.पोलिसांच्या तपास काय निष्पन्न होते. याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.