सोशल मिडीयावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात अशीच एक व्यक्ती म्हणजे कांता प्रसाद. 'बाबा का ढाबा' म्हणून प्रसिद्ध झालेल्या 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद (kanta prasad) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दिल्लीतील मालवीय नगर भागात राहणाऱ्या कांता प्रसाद यांनी दारू पिऊन झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री साधारणपणे दहा वाजताच्या सुमारास घडली. (Baba ka dhaba kanta prasad attempted to commit suicide in dehli) कांता प्रसाद यांना रात्री उशिरा दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता बाबा कांता प्रसाद धोक्याच्या बाहेर आहेत. यासंदर्भात पोलिसांना रुग्णालयाकडूनच माहिती मिळाली.