India

Army Chopper Crash | बिपीन रावत यांच्यासह प्रवास करणारे ‘हे’ आहेत 9 बडे अधिकारी

Published by : Lokshahi News

तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत चारजण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हेलिकॉप्टरमधून एकूण नऊजण प्रवास करत होते. त्यात माजी लष्करप्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) हे पत्नीसह प्रवास करत होते. या अपघातात तेही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमींना जवळच्या वेलिंग्टन बेसमध्ये नेण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  • हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे अधिकारी
  • सीडीएस बिपीन रावत
  • मधुलिका रावत
  • ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर
  • लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग
  • गुरुसेवक सिंग
  • जितेंद्र कुमार
  • विवेक कुमार
  • बी. साई तेजा
  • हवालदार सतपाल

दरम्यान, संरक्षण खात्याने या दुर्घटनेची सर्व माहिती घेतली असून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. वेलिंग्टनमध्ये आर्म्ड फोर्सचं महाविद्यालय आहे. या ठिकाणी रावत यांचं लेक्चर होतं. तिथून ते कुन्नूरकडे निघाले होते. त्यांना तिथून दिल्लीला जायचं होतं. मात्र, घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली.

Oath Taking Ceremony: कोण होणार मुख्यमंत्री? वानखेडेवर भव्य शपथविधी सोहळा

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : महायुतीचा शपथविधी 25 तारखेला वानखेडे स्टेडियमवर होणार

Ulhasnagar Assembly Election 2024 Result: उल्हासनगरमध्ये ओमी कलानी यांचा पराभव करत कुमार आयलानी विजयी

Vasai Virar Vidhansabha: वसई-विरार, नालासोपाऱ्यात बविआला मोठा धक्का, क्षितिज ठाकूर यांचा दाणुन पराभव

महाविकास आघाडीला मोठा झटका, दिग्गजांचा पराभव