पुणे मेट्रोचे उद्घाटन, मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणी, यांसह अनेक प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात पोहोचले असुन, MIT महाविद्यालयात कार्यक्रम सुरू असलेल्या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमूख्यमंत्री अजित पवार मांडीली मांडी लावून उपस्थित राहीले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणानंतर उपमूख्यमंत्री अजित पवार भाषणाला उभे राहीले. या भाषणादरम्यान अजित पवारांनी पुण्यातील आगामी विकासकामांचा संक्षिप्त आढावा पुणेकरांसमोर मांडला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनावश्यक वक्तव्यांकडे वेधून घेतले.
काय म्हणाले अजित पवार?
"मला पंतप्रधान नरेंद्र मोंदीना एक लक्षात आणून द्यायचे आहे, की गेल्या काही दिवसांपासून संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य केली जात आहेत. मोठ्या पदावरील व्यक्तिंनी अनावश्यक वक्तव्य करु नये", असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चक्क पंतप्रधान मोदींसमोरच टोला लगावला. "शिवछत्रपतींनी राजमाता जिजाऊंच्या संकल्पनेतून स्वराज्य उभारले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक विचारांच्या सहाय्याने समाजकार्य केले. या कोणाबद्दल देखील असुया किंवा द्वेष न ठेवता आपल्याला विकासाचे काम पुढे न्यायचे आहे", असेही यावेळी अजित पवार म्हणाले.