Mumbai

बापरे चक्क मित्राने वाढदिवसानिमित्त भेट म्हणून चंद्रावर घेऊन दिली 1 एकर जमीन

Published by : Lokshahi News

विकास काजळे, इगतपुरी

मैत्रीचे अनेक किस्से चित्रपटांपासून पुस्तकांपर्यंत सर्वत्र वाचायला, बघायला मिळतात. परंतु नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमालामध्ये मैत्रीतील गोडव्याचे अनोखे उदाहरण नुकतेच समोर आले. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या रूपेश हरिश्चंद्र नाठे यांना वाढदिवसानिमित्त त्यांचे मित्र डॉ. हृषीकेश प्रदीप मुधळे आणि त्यांच्या कुटुंबाने थेट चंद्रावर १ एकर जमीन भेट स्वरुपात दिली आहे.

यामुळे दिवंगत अभिनेते सुशांत सिंग नंतर चंद्रावर जमीन घेणारे डॉ रुपेश नाठे यांची नाशिकसह महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे.

डॉ रुपेश नाठे इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील रहिवासी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पालखी महाराष्ट्रातील गोंदे दुमाला या छोट्याशा गावातून सुरू केल्याने डॉ मित्र ऋषिकेश मुधळे यांनी चंद्रावर जागा घेऊन दिल्याने रुपेशला देखील आनंद झाला असून त्याचे मित्र अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून त्यांनी जागा घेऊन दिल्याचे रुपेश नाठे यांनी सांगितलय.


जमीन खरेदीची कायदेशीर प्रक्रिया इंटरनॅशनल लुनार लॅण्ड्स अथॉरिटी यांच्याकडे पूर्ण करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेले रूपेश नाठे यांनी गोंदे येथून महाराष्ट्रात प्रथमच छत्रपती शिवरायांची पालखी सुरू केली. विविध सामाजिक कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग बघून त्यांच्या कार्याची पोच पावती म्हणून ही अनोखी भेट दिल्याचं त्यांचे मित्र डॉ. मुधळे व कुटुंबाने सांगितलं.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी